Join us  

Selfiee Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? अक्षय कुमारचा 'सेल्फी' पाहून चाहते निराश, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:09 AM

Selfiee Twitter Review: ट्विटरवर अनेकांनी 'सेल्फी' या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काहींना सिनेमा आवडला आहे. पण बहुतांश लोकांची या सिनेमानं निराशा केली आहे.

Selfiee Twitter Review: अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि इमरान हाश्मी यांचा 'सेल्फी' (Selfie Movie) हा सिनेमा रिलीज झालाये आणि याचसोबत हा सिनेमा ट्विटरवर ट्रेंड करतोय. अक्षयच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. अक्कीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, असं ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात सिनेमा रिलीज झाल्यावर पब्लिकच्या कमेंट्स मेकर्सची निराशा करणाऱ्या आहेत. ट्विटरवर अनेकांनी या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काहींना सिनेमा आवडला आहे. पण बहुतांश लोकांची या सिनेमानं निराशा केली आहे. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय. अनेकांनी सिनेमाला डिजास्टर म्हटलं आहे. काही लोकांनी तर अक्षयकडे तिकिटाचे पैसेही परत मागितले आहे.पाहुया ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया...

'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी 'सेल्फी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सेल्फी या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सेल्फी या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहेत.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'सेल्फी' पाठोपाठ अक्षयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'वेडात मराठे, वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात अक्षय कुमार काम करणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात अक्षय छत्रपती शिवरायांची भूमिका साकारताना दिसणार आहे.   2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या सिनेमातही अक्षयची वर्णी लागली आहे. याशिवाय वेलकम 3 या चित्रपटातही तो लीड भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारइमरान हाश्मीबॉलिवूड