Join us  

अक्षय कुमारच्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा, 'खेल खेल में' या खास दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:51 PM

अक्षय कुमार - तापसी पन्नूच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची घोषणा झालीय. रिलीजच्या तारखेला दोन बड्या सिनेमांची टक्कर होणार आहे (khel khel mein, akshay kumar)

अक्षय कुमारचे एकामागोमाग एक सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहेत. २०२४ मध्ये अक्षयचे 'बडे मिया छोटे मिया' आणि 'सरफिरा' हे दोन सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. अशातच अक्षयच्या आणखी एका सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. 'खेल खेल में' असं या सिनेमाचं नाव असून हा एक मल्टिस्टारर सिनेमा असणार आहे. कॉमेडी आणि रहस्यांची रोलरकोस्टर राईड 'खेल खेल में' सिनेमात दिसणार आहे.

'खेल खेल में' सिनेमाची अधिकृत घोषणा

 बहुप्रतिक्षित 'खेल खेल में' या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमधून हा सिनेमा रोमांचक रहस्य आणि कॉमेडीची सफर असणार यात शंका नाही. या सिनेमातून तुम्ही खळखळून हसाल शिवाय तुमचं मनोरंजनही होईल अशी खात्री सिनेमाची टीम देत आहे. 'खेल खेल में' सिनेमात लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, अम्मी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल आणि फरदीन खान हे कलाकार सिनेमात झळकणार आहेत.

'खेल खेल में'ची 'स्त्री २' सोबत टक्कर

गुलशन कुमार, टी-सीरीज आणि वाकाऊ फिल्म्स 'खेल खेल में' सिनेमाचे निर्माते आहेत. मुदस्सर अझीझ यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' सिनेमाची राजकुमार राव - श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' सिनेमासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारतापसी पन्नू