आज इंडस्ट्रीचा खिलाडी कुमार म्हणून लोकप्रिय असलेल्या अक्षयनं (Akshay Kumar)बॉलिवूडमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्याने इंडस्ट्री गाजवत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत नाव मिळवलं. अक्षय हा सुपस्टार असला तरी तो त्याचं कुटुंब हे लाईमलाईटपासून दूर असतं. पण, आता अक्षयच्या कुटुंबातील एका सुंदरीनं धमाका केलाय. ती आहे अक्षयची भाची सिमर भाटिया(Simar Bhatia). सिमर भाटिया हिचा वृत्तपत्रात झळकलेला फोटो पाहून खिलाडी कुमारदेखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अक्षयनं (Akshay Kumar Pens Heartfelt Note for Simar Bhatia ) तिच्यासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या लाडक्या भाचीचा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला फोटो पाहून अक्षय कुमारला त्याच्या सुरुवातीचे दिवस आठवले. पोस्टमध्ये त्यानं लिहलं, "मला आठवतं की मी पहिल्यांदा माझा फोटो वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पाहिला होता. तेव्हा मला वाटलं होतं की हाच सर्वात मोठा आनंद आहे. पण आज मला कळालं की आपल्या मुलांची अशी प्रगती पाहण्याचा आनंद सर्वांत जास्त आहे. आज आई असती तर म्हणाली असती 'सिमर बेटा, तू अप्रतिम आहेस'. तुला आशीर्वाद, भरारी घेण्यासाठी हे आकाश तुझंच आहे". अक्षयच्या या पोस्टवर कलाकारांसह चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. तर सिमरनेही अक्षय कुमारची पोस्ट इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे.
सिमर भाटिया ही अक्षय कुमारची बहीण अलका भाटियाची मुलगी आहे. सिमर भाटिया ही श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. 'इक्किस' हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान परमवीर चक्र पुरस्कार विजेते लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये तिची जोडी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Amitabh Bachchan's Grandson Agastya Nanda) आहे. अगस्त्य नंदा हा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जयदीप अहलावत देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'स्कॉय फोर्स' सिनेमा २४ जानेवरी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेहमीप्रमाणे एका दमदार भुमिकेत अक्षय कुमार पहायला मिळणार आहे.