Join us

​गुलशन कुमारच्या बायोपिकमध्ये आता नसणार अक्षय कुमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 10:03 AM

एकापाठोपाठ एक अशा अनेक धडाकेबाज चित्रपटांनंतर अक्षय कुमार ‘मोगुल’ या चित्रपटात दिसणार होता. पण आता अक्षय कुमारने हा चित्रपट ...

एकापाठोपाठ एक अशा अनेक धडाकेबाज चित्रपटांनंतर अक्षय कुमार ‘मोगुल’ या चित्रपटात दिसणार होता. पण आता अक्षय कुमारने हा चित्रपट सोडल्याची खबर आहे. टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित या बायोपिकमध्ये अक्षयची वर्णी लागली होती. चित्रपटाचा फर्स्ट लूकही जारी झाला होता. पण अचानक अक्षयने हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांचे मानाल तर यामागे दिग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोगुल’मध्ये अक्षयने काही बदल सुचवले होते. दिग्दर्शक सुभाष कपूर यांना त्याने हे बदल सांगितले होते. स्क्रिप्टमधील काही सीन्स नव्याने लिहिले जावेत, अशी अक्षयची इच्छा होती. पण अक्षयच्या या मागणीकडे सुभाष कपूर यांनी कानाडोळा केला. दिग्दर्शकाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अक्षयने या चित्रपटातून बाहेर पडणेच योग्य समजले. अर्थात अद्याप अक्षयने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.ALSO READ : अमिताभ बच्चन अक्षय कुमारला म्हणाले, अक्षय तू असे करायला नको होते! पण का?‘मोगुल’च्या पोस्टरमध्ये हा चित्रपट नव्या वर्षात रिलीज होणार, असे म्हटले होते. पण आता अक्षयने आपल्या फ्री डेट्स दुस-या निर्मात्यास दिल्या आहेत.‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमारची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय व गुलशन कुमार यांच्यात बºयाच अंशी साम्य आहे. अक्षय आणि आम्ही पंजाबी आहोत. तो दिल्लीचा आहे. माझे वडिलही दिल्लीचे होते, असे ती म्हणाली होती. पण आता कदाचित तुलसीला अक्षयच्या जागी दुसºया अभिनेत्याचा शोध घ्यावा लागणार, असे दिसतेय. गुलशन कुमार यांच्या या बायोपिकसाठी अक्षयने २७ कोटी आणि नफ्यात काही वाटा इतकी फी घेतल्याची चर्चा होती. तूर्तास अक्षय आर. बल्की यांच्या ‘पॅडमॅन’मध्ये बिझी आहे. याशिवाय रिमा कागती यांच्या ‘गोल्ड’ या सिनेमातही तो दिसणार आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. तर  ‘गोल्ड’  हा चित्रपट भारतीय हॉकी खेळाडू बलबीर सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वातील हॉकी संघाने १९४८, १९५२ व १९५६ साली झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत स्वर्णपदक मिळविले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे.