Join us  

फोटो काढायला आलेल्या जवानाला क्रू मेंबरने केलं बाजूला, अक्षय कुमारने जे केलं ते बघून कराल त्याला सॅल्यूट....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 6:18 PM

अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) त्याच्या खास स्टाइलमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar)  त्याच्या खास स्टाइलमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. अक्षय सध्या त्याच्या एका नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ज्यात तो त्याच्या एका चाहत्यासोबत कॅमेऱ्यासमोर दिसतो आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला सर्वजण बाजूला होण्यास सांगतात, त्यानंतर अक्षय कुमारने जे केलं त्याने सगळ्यांची मनं जिंकली. 

अक्षय कुमारच्या या कृतीचे चाहते कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार व्हॅनिटी व्हॅनमधून कॅमेराकडे जाताना दिसत आहे. दरम्यान, हा व्यक्ती त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतो, मात्र तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तेथून बाजूला करण्यासाठी तातडीने धाव घेतो. 

अक्षय कुमारने तिला घेऊन कॅमेऱ्याच्या समोर उभ राहण्यास सांगतो आणि नंतर पापाराझींसाठी पोज देताना दिसला. अक्षयच्या या व्हिडिओवर चाहते  कमेंट करत आहेत आणि अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. या व्यक्तीला तिथून बाजूला करताना पाहून नाराज झालेल्या एका चाहत्याने लिहिले की, 'त्या यूनिफॉर्मचा आदर करा, आमच्यासाठी देशाचे हिरो आमची सेना आहे, त्यानंतर आणखी कुणी.'

 

लवकरच अक्षय कुमारचा ‘अतरंगी रे’ सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाला ए.आर. रहमान संगीत देणार आहे. सारा अली खान, अक्षय कुमार व धनुष यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं कमालीचं ठरणार आहे.हा चित्रपट २४ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
टॅग्स :अक्षय कुमार