Akshay Kumar on Flop Films : अक्षय कुमार (Akshay Kumar )हा बॉलिवूडचा सर्वात बिझी स्टार आहे. एकापाठोपाठ एक सिनेमे देणारा तो बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव अभिनेता. अक्षयचा सिनेमा म्हटल्यावर त्यावर चाहत्यांच्या उड्या पडायच्या. पण गेल्या काही महिन्यात अक्षयचे एकापाठोपाठ एक तीन सिनेमे दणकून आपटले. आधी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यानंतर आलेला त्याचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा सुद्धा आपटला आणि अलीकडे रिलीज झालेला ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची देखील अशीच गत झाली. आता या फ्लॉप सिनेमांची जबाबदारी कोण घेणार? तर ती अक्षयने आपल्या खांद्यावर घेतली आहे. माझे सिनेमे फ्लॉप होत असतील तर त्याची जबाबदारी मलाच घ्यायला हवी आणि मी ती घेतो, असं अक्षय एका ताज्या मुलाखतीत म्हणाला.
काय म्हणाला अक्षय?मीडियाशी बोलताना तो म्हणाला, ‘माझ्या फ्लॉप सिनेमांची जबाबदारी माझी आहे. सिनेमे चालत नसतील तर ती चूक माझी आहे. नक्कीच, मी याबद्दल विचार करेल. मला कसे सिनेमे निवडायला हवेत, याचा देखील मी विचार करेल. मी कशा स्क्रिप्ट निवडायला हव्यात, जेणेकरून माझ्या चाहत्यांना माझे सिनेमे आवडतील, याचा गंभीर विचार करेल. मी एखादा सिनेमा करतोय आणि तो चालत नसेल तर त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे.’
हा लोकांचा हक्क... ओटीटीवर सिनेमांना चित्रपटगृहांपेक्षा अधिक यश मिळतं का? असा प्रश्न केला असता तो म्हणाला, ओटीटी व चित्रपटगृहांचा प्रेक्षक वेगवेगळा आहे. पण हो, दोन्ही ठिकाणच्या प्रेक्षकवर्गाला त्यांना चित्रपट आवडला की नाही, हे सांगण्याचा हक्क आहे. ओटीटीवर तुमचा सिनेमा येतो, लोक तो पाहतात आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देतात. क्रिटीक्सही तो सिनेमा पाहतात आणि आपलं मत देतात. माझ्यासाठी ओटीटी आणि थिएटर्स दोन्ही ठिकाणच्या चित्रपटांबद्दलची प्रेक्षकांची, क्रिटीक्सची मतं महत्त्वाची आहेत. चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि केवळ याचमुळे तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवू शकता. अक्षयचे आगामी सिनेमेअक्षयचे सलग तीन सिनेमे फ्लॉप ठरते. पण त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहेत. त्याचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. जॉली एलएलबी 3, रामसेतू, कॅप्सूल गिल, बडे मियां छोटे मियां, गोरखा, ओह माय गॉड 2, सेल्फी असे अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याशिवाय ‘कटपुतली’ या सिनेमातही तो झळकणार आहे.