सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. आता अक्षयचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘रक्षाबंधन’ हा त्याचा सिनेमा येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. पण त्याआधीच ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. #BoycottRakshaBandhan सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. आता अक्षयने ‘रक्षाबंधन’ला विरोध करणाºया हेटर्सला उत्तर दिलं आहे. कोलकात्यात ‘रक्षाबंधन’च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तो यावर बोलला.
काय म्हणाला अक्षय#BoycottRakshaBandhan ट्रेंडबद्दल अक्षयला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘ भारत एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाला हवं ते करण्याची मुभा आहे. तुम्हाला एखादा चित्रपट आवडत नसेल तर तुम्ही तो पाहू नका. ती तुमची निवड आहे. सोशल मीडियावर काही मूठभर लोक जे अशाप्रकारचा खोडसाळपणा करत आहेत. पण अशाप्रकारच्या गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाही. कारण इंडस्ट्री कुठलीही असो फिल्म इंडस्ट्री किंवा मग कपड्यांची इंडस्ट्री ती भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करत असते. आपण सर्व आपल्या देशाला एक महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मी लोकांना विनंती करेल की, तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका. पण त्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करू नका. कोणत्याही चित्रपटावर बहिष्कार टाकू नका.
आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन प्रकारातील असणार आहे.