Join us  

'राजीव भाटीया'चा 'अक्षय कुमार' कसा झाला? अखेर अभिनेत्याने इतक्या वर्षांनी खरं कारण सांगितलंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 1:49 PM

अक्षय कुमारने त्याचं खरं नाव राजीव का बदललं यामागचं खरं कारण अनेक वर्षांनी सर्वांना सांगितलंय (akshay kumar)

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता. खिलाडी ही अक्षय कुमारचीबॉलिवूडमध्ये ओळख. अक्षयने विविध सिनेमांमधून बहुरंगी भूमिका साकारल्यात. अक्षय कधी कॉमेडी करताना दिसतो तर कधी मारधाड करताना पाहायला मिळते. तर कधी भावुक प्रसंगातून रडवतो. अक्षयने एका मुलाखतीत  इतक्या वर्षांनी त्याने मूळ नाव का बदललं, याचा खुलासा केलाय. काय  म्हणाला अक्षय जाणून घ्या.

अक्षयने त्याचं राजीव नाव का बदललं?

महेश भट्ट दिग्दर्शित 'आज' चित्रपटात अक्षय कुमारने काम केलं होतं. अक्षयचा हा पहिलाच सिनेमा. या सिनेमात राज बब्बर, स्मिता पाटील आणि कुमार गौरव हे कलाकार होते. Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने शेअर केलं की, “या चित्रपटात कुमार गौरवच्या भुमिकेचे नाव अक्षय असे होते. त्यामुळे मलाही माझे नाव गवसले. हे फार लोकांना माहीत नाही. माझे खरे नाव राजीव आहे. शूटिंग दरम्यान मी चित्रपटातील नायकाला त्याचे नाव काय आहे हे विचारले. ते अक्षय म्हणाले. मी मग माझेही नाव बदलून अक्षय ठेवायचा निर्णय घेतला."

राजीव हे नाव चांगले होते पण...

अक्षयने पुढे स्पष्ट केले की, पुजारी किंवा इतर कोणाच्याही सल्ल्यानुसार त्याने नाव बदलले नाही. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला नाव बदलण्याबद्दल विचारले तेव्हा त्याने स्पष्ट केलं की, चित्रपटातील नायकाचं नाव त्याला आवडलं म्हणून त्याने नाव बदललं. अक्षय पुढे सांगतो, “राजीव हे एक चांगले नाव आहे. मला वाटते तेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. पण मी ते बदलले. पंडितांनी मला माझे नाव बदलण्याचा सल्ला दिला असं काही नाही!" अशाप्रकारे इतक्या वर्षांनी अक्षयने नाव बदलण्यामागचं खरं कारण सांगितलं. अक्षयचा 'सरफिरा' सिनेमा नुकताच रिलीज झालाय. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड