सलमान शाहरुखला जे जमलं नाही ते अक्षय कुमारने करुन दाखवले, म्हणून त्याला म्हणतात खिलाडी कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:51 AM2020-06-05T11:51:43+5:302020-06-05T11:59:53+5:30
2019 मध्ये त्याने तब्बल चार हिट सिनेमा दिले आहेत.
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव सगळ्यातवर येते. 2019 मध्ये त्याने तब्बल चार हिट सिनेमा दिले आहेत. ज्यापैकी तीन सिनेमांनी 200 कोटींच्यावर कमाई केली आहे. 2020मध्ये अक्षय कुमार एकमेव असा भारतीय आहे ज्याने फोर्ब्सच्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत अक्षय कुमारचे नाव 52व्या स्थानी आहे.
2019 जून ते 2020 मे महिन्यापर्यंत अक्षय कुमारने 48.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 366 कोटींची कमाई केली आहे. 2019मध्ये या यादीत अक्षय 33व्या स्थानावर होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अक्षय 19 अंकांनी मागे गेला आहे. या यादीत जेनर, कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अक्षयचा बहुचर्चित लक्ष्मी बॉम्ब हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हॉटस्टारने लक्ष्मी बॉम्ब १२५ कोटींना खरेदी केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहेत.. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.