Join us

शाहरुख खान, प्रीती झिंटानंतर आता अक्षय कुमार बनला क्रिकेट टीमचा मालक, म्हणाला, "सिनेमा ते स्टेडियम..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 3:50 PM

अक्षयने नुकतीच क्रिकेट टीम खरेदी केली आहे. शाहरुख खान आणि प्रीती झिंटानंतर आता खिलाडी कुमारही क्रिकेट टीमचा मालक झाला आहे. 

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख मिळवलेला अक्षय कुमार कायमच चर्चेत असतो. कधी सिनेमा तर कधी जाहिरातीमुळे चर्चेत असलेला अक्षय आता मात्र क्रिकेटमुळे चर्चेत आला आहे. अक्षयने नुकतीच क्रिकेट टीम खरेदी केली आहे. शाहरुख खान आणि प्रीती झिंटानंतर आता खिलाडी कुमारही क्रिकेट टीमचा मालक झाला आहे. 

अक्षय कुमारने इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीग म्हणजे आयएसपीएलमधील (ISPL) क्रिकेट टीम खरेदी केली आहे.  श्रीनगर ही टीम खरेदी करून या टीमचा खिलाडी कुमार मालक बनला आहे. २ ते ९ मार्च २०२४ दरम्यान हे क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. अक्षय कुमारला स्पोर्ट्स आणि मार्शलमध्ये रुची आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी आईएसपीएलमध्ये श्रीनगर टीमचा भाग बनून उत्साहित आहे. क्रिकेटच्या विश्वात ही टुर्नामेंट गेम चेंजर ठरू शकते. आणि यासाठी मी उत्सुक आहे." 

ISPLमध्ये श्रीनगर क्रिकेट टीमचा मालक बनल्यानंतर अक्षय कुमारने पोस्ट शेअर केली आहे.  "सिनेमा ते स्टेडियम! आयएसपीएलमध्ये श्रीनगर टीमचा मालक बनून सहभागी होत असल्याचं सांगताना मला गर्व होत आहे," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.  अक्षय कुमार अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'मिशन रानीगंज'मध्ये दिसला होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता 'बड़े मिया छोटे मिया' या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारऑफ द फिल्डसेलिब्रिटी