मागील वर्षी 'गदर २' हिट झाल्यानंतर बॉलिवूडच्या सर्व यशस्वी चित्रपटांचे सीक्वल बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या शर्यतीत २००० च्या दशकातील अनेक मोठ्या हिट चित्रपटांची नावे आहेत, तर अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या एका सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल देखील बनवला जाणार आहे. २००४ मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा स्टारर 'ऐतराज' (Aitraaz 2) हा खूप लोकप्रिय चित्रपट होता. आता 'ऐतराज'चे निर्माते सुभाष घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वलवर काम करत असल्याची पुष्टी केली आहे. तथापि, त्यांनी आणखी एक अपडेट शेअर केली आहे, जी कदाचित लोकांना आवडणार नाही.
गोव्यात ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डीएनएशी बोलताना सुभाष घई यांनी 'ऐतराज'च्या सीक्वलच्या वृत्ताला दुजोरा दिला. सीक्वलमध्ये प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार किंवा करीना कपूर नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यामागचे कारण सांगताना सुभाष म्हणाले की, 'ऐतराज' रिलीज होऊन २० वर्षांहून अधिक काळ झाला असून आता नव्या पिढीतील कलाकारांना घेऊन त्याचा सीक्वल बनवावा लागणार आहे. सुभाष घई यांनी त्यांचे प्रॉडक्शन हाऊस 'खलनायक २'वर देखील काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाला की, 'कहाणी आणि कलाकार ३-४ महिन्यांत लॉक झाल्यावर आम्ही संपूर्ण घोषणा करू.'
'ऐतराज २'चं हा दिग्दर्शक करणार दिग्दर्शन २००४ मध्ये रिलीज झालेल्या 'ऐतराज'ची निर्मिती सुभाष घई यांनी केली होती आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अब्बास-मस्तान. पण 'ऐतराज २'साठी सुभाष घई यांनी 'OMG २' दिग्दर्शित केलेल्या अमित रायची निवड केलीय. ते म्हणाले, 'मी अमित राय यांच्याकडून एक उत्तम स्क्रिप्ट ऐकली आहे, जी सध्या 'ऐतराज २' म्हणून लिहिली जात आहे. आम्हाला वेगवेगळ्या स्टुडिओमधून चित्रपट बनवण्यात रस असल्याचे फोन येत आहेत आणि मी म्हणायलाच पाहिजे की अमितने यावेळी पुन्हा एक उत्तम स्क्रिप्ट बनवली आहे. मला ती खूप आवडली आहे.