Join us

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’वर भडकले भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, दिली FIRची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 4:16 PM

Akshay Kumar Film Ram Setu Controversy : रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला अक्षयचा सिनेमा, वाचा काय आहे प्रकरण

Akshay Kumar Ram Setu Controversy : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar ) सध्या त्याच्या ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे आणि याचवर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय. अभिषेक शर्माने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमासोबत नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस लीड रोलमध्ये आहेत. तूर्तास अक्षयचा हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy ) यांनी ‘राम सेतू’मध्ये चुकीची तथ्य दाखवल्याचा आरोप करत, अक्षयविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे. सुब्रमण्यम स्वामी हे अक्षय कुमार विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. चित्रपटात राम सेतूचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तथ्यांशी छेडछाड केल्याचा त्यांचा दावा आहे.

स्वामींचं ट्विट 

 ‘माझे सहकारी अधिवक्ता सत्य सब्रवालद्वारे केस दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्याविरोधात ‘राम सेतू’त चुकीची तथ्य दाखवणे आणि राम सेतूच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबद्दल दावा दाखल करत आहे,’ असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

‘जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून त्याच्या दत्तक देशातून बाहेर काढण्यास सांगू शकतो,’ असं त्यांनी यात लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘राम सेतू’चं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या पोस्टवरून अक्षय जबरदस्त ट्रोल झाला होता.  

टॅग्स :अक्षय कुमारसुब्रहमण्यम स्वामीबॉलिवूड