Join us  

'शूटिंग घाईत संपवतो म्हणूनच सिनेमे फ्लॉप', आरोपांवर अक्षयने दिलं उत्तर; म्हणाला, 'हे तेच लोक...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 5:03 PM

जास्तीत जास्त सिनेमे करण्याच्या नादात अक्षय घाईघाईत शूटिंग पूर्ण करतो असा त्याच्यावर नेहमी आरोप होतो.

गेल्या काही वर्षात 'खिलाडी' अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक चित्रपट फ्लॉप झाले. 'ओह माय गॉड 2' हाच तेवढा चालला. आता त्याचा 'सरफिरा' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत मात्र बॉक्सऑफिसवर सिनेमाला फारशी चांगली कमाई करता आलेली नाही. जास्तीत जास्त सिनेमे करण्याच्या नादात अक्षय घाईघाईत शूटिंग पूर्ण करतो असा त्याच्यावर नेहमी आरोप होतो. या आरोपांवर आता अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.

'गलाटा प्लस'शी बातचीत करताना अक्षयने टॉम क्रुझच्या सिनेमाचं उदाहरण दिलं. तो म्हणाला, "टॉम क्रुझचा सिनेमा मिशन इम्पॉसिबल ज्याला बेस्ट अॅक्शन मूव्ही म्हणलं जातं. तुम्हाला माहितीये का या सिनेमाचं शूट फक्त 55 दिवस चाललं होतं. क्वॉलिटीकडे दुर्लक्ष न करता मी माझ्या प्रत्येक सिनेमांना पुरेसा वेळ देतो तेही. असे काही सिनेमे आहेत ज्यांना ७५ दिवस लागले तर काही असेही आहेत जे ३० दिवसात पूर्ण झाले. दिग्दर्शकाला हवा तेवढा वेळ मी देतो. मी यात जास्त खोलात जाऊ इच्छित नाही कारण मला माहितीये असे आरोप करणारे तेच लोक आहेत ज्यांना मी आवडत नाही."

लोकांना कंटेंट, क्वॉलिटीशी मतलब आहे. तुम्ही काय बनवून देत आहात याकडे त्यांचं लक्ष असतं. शूट लवकर संपवतो म्हणून आधी माझं कौतुक व्हायचं कारण तेव्हा सिनेमे हिट होत होते. आता सिनेमे फ्लॉप होत आहेत म्हणून तीच गोष्ट कशी चूक हे दाखवलं जात आहे."

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसिनेमा