Join us

Samrat Prithviraj Box Office 7: ‘हिट मेकर’ अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चा ‘खेळ’ खल्लास, 7 दिवसांची कमाई वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:29 PM

Samrat Prithviraj Box Office Collection Day 7 : अक्षयचा हा बॅक टू बॅक दुसरा फ्लॉप सिनेमा आहे. याआधी त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमाही असाच दणकून आपटला होता.

Samrat Prithviraj In Huge Loss: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला असं म्हणायला हरकत नाही. जबदस्त प्रमोशन शिवाय राजकीय नेत्यांकडून झालेलं कौतुक याऊपर या सिनेमाची अवस्था वाईट आहे. आठवडाभरातच सिनेमाला प्रेक्षक मिळेनासे झाले आहेत. दरदिवसाच्या कमाईत घट होताना दिसतेय. काल गुरूवारी रिलीजच्या सातव्या दिवशीही  या चित्रपटानं फक्त 2.75 कोटींचं कलेक्शन केलं. 7 दिवसांत या चित्रपटानं एकूण 52.25 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवर नजर टाकल्यास, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर करावा लागत असलेला स्ट्रगल स्पष्ट  दिसतो. गेल्या शुक्रवारी 3 जूनला हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजच्या दिवशी या चित्रपटाने 10.70 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी 12.60 कोटींची व रविवारी 16.10 कोटींची बिझनेस केला. यानंतर मात्र ‘सम्राट पृथ्वीराज’च्या कमाईला ओहटी लागली. सोमवारी चित्रपटाने 5 कोटींचा गल्ला जमवला. मंगळवारी 4.25 कोटी तर  बुधवारी 3.60 कोटी कमावले.

‘हिट मेकर’ अक्षय कुमारच्या चित्रपटाची अशी गत व्हावी, हे शॉकिंग आहे. अक्षयचा हा बॅक टू बॅक दुसरा फ्लॉप सिनेमा आहे. याआधी त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमाही असाच दणकून आपटला होता. ‘सम्राट पृथ्वीराज’कडून सगळ्यांनाच अपेक्षा होत्या. पण त्या सगळ्या फेल ठरल्या. या वीकेंडला ‘सम्राट पृथ्वीराज’ बरी कमाई करेल, अशी अपेक्षा आहे. असे न झाल्यास मग मात्र कठीण आहे...

अनेक ठिकाणी शो कॅन्सलयशराज फिल्म्सच्या या चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रेक्षक मिळेनासे झाले आहेत. अशात अनेक ठिकाणी ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’च्या मेकर्सला 100 कोटींपेक्षा अधिकचा तोटा झाला आहे. ओटीटी राईट्स विकून मेकर्सनी तगडी रक्कम वसूल केली आहे. पण याऊपरही ‘सम्राट पृथ्वीराज’च्या मेकर्सला मोठा फटका बसला आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’वर 300 कोटींचा खर्च झाला. या चित्रपटाचे ओटीटी व सॅटेलाईट्स राईट्स 120 कोटींला विकले गेले आहेत. पण बॉक्स ऑफिसवर 7 दिवसांत या चित्रपटाने केवळ 52.25 कोटींची कमाई केली. हा आकडा फारसा समाधानकारक नाही.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसिनेमा