बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही कॉन्सर्ट किंवा पुरस्कार सोहळ्याचा नसून एका लग्न समारंभातील परफॉर्मन्सचा आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार स्टेजवर गाताना दिसतोय.
अक्षय कुमारचा हा व्हिडिओ 4 डिसेंबर 2024 रोजी Xवरील फॅन पेजवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करण्यात आला आहे. अक्षयचा हा व्हिडीओ पाहून तुमची खात्री पटेल की उत्कृष्ट अभिनय, कॉमिक टायमिंग आणि ॲक्शनमध्ये पारंगत असलेला हा खिलाडी कुमार गाणे गाण्यातही तितकाच उस्ताद आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय त्याच्या 'स्पेशल 26' चित्रपटातील 'मुझमे तू' गाणे गाताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात हा विवाहसोहळा पार पडला होता, ज्यामध्ये अक्षयने आपल्या गायनाने उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन केले.
अक्षय कुमारने यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'हाऊसफुल'साठी अक्षयने पहिल्यांदा रॅप केलं होतं. दरम्यान, अक्षयसाठी 2024 काही खास नाही राहिलं. त्याचे चित्रपट तर रिलीज झाले, पण त्यांना यश नाही आलं. अलीकडेच अक्षय रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्सच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसला होता. अक्षयचा आगामी चित्रपट 'स्काय फोर्स' हा ॲक्शन-ड्रामा आहे. हा चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'स्काय फोर्स' व्यतिरिक्त, अक्षयकडे सी. शंकरन नायर, 'जॉली एलएलबी 3', 'हाऊसफुल 5' हे सिनेमे आहेत.