फोर्ब्सने आशियातील 100 डिजिटल स्टार्संची यादी जाहीर केली आहे, ज्यात जगभरातील अशा स्टार्सची नावं आहेत ज्यांनी त्यांच्या सिनेमा, गाणी आणि मालिका तसेच सोशल मीडियावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ज्याच्या फॅन फॉलोव्हिंगने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, "100 सेलिब्रिटींच्या या यादीमध्ये 20 ते 78 वर्षांच्या कलाकरांचा देखील समावेश आहे, जे सोशल मीडियाची ताकद दर्शवितात.
बॉलिवूड कलाकारांच्या लिस्टमध्ये सगळ्यातवर अक्षय कुमारचे आहे. अक्षय फक्त बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त सिनेमा करत नाही तर सोशल मीडियावर तो चाहत्यांच्या संपर्कातही असतो आणि म्हणूनच आज सोशल मीडियावर त्याला जवळपास 131 मिलियन फॉलोअर्स आहेत. अक्षय फक्त बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणूनच नव्हे तर लोकांच्या मदतीसाठी धावून येण्यासाठीदेखील ओळखला जातो. त्यांने कोविड -19 देशाला मोठी आर्थिक मदत केली.
2021 मध्ये अक्षय बॉक्स ऑफिसवर धमाका करायला तयार आहे. अक्षयकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. अक्षय कुमारचा सर्वात मोठा सिनेमा 'सूर्यवंशी' यंदा रिलीज होऊ शकला नाही. हा सिनेमा 2021मध्ये रिलीज होणार आहे. 2021मध्ये अक्षय कुमारचे जवळपास 6 सिनेमे रिलीज होणार आहेत.