Join us  

अक्षय कुमारचा मुलगा आरव आता वडिलांपेक्षाही उंच आणि दिसतो हॅंडसम, बघा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 3:40 PM

Akshay Kumar son Aarav : या फोटोत अक्षय कुमारचा मुलगा आरवचा डॅशिंग लूक पाहून फॅन्स खूश झाले आहेत. आरव फोटोत ब्लूड डेनिम, व्हाइट टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

Akshay Kumar son Aarav : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या पर्सनल लाइफमुळेही नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपासून तो विमल कंपनीच्या जाहिरातीवरून ट्रोल होत होता. फॅन्स रागावल्यावर त्याने सोशल मीडियावर जाहिरपणे माफीही मागितली होती. तसेच जाहिरातीतून मिळालेले पैसे दान देणार असल्याचेही सांगितलं होतं. अक्षय कुमारसोबतच त्याचा मुलगा आरव सुद्धा चर्चेत असतो. आरवचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

या फोटोत अक्षय कुमारचा मुलगा आरवचा डॅशिंग लूक पाहून फॅन्स खूश झाले आहेत. आरव फोटोत ब्लू डेनिम, व्हाइट टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. आरवचे दोन्ही फोटो सलूनमध्ये जाण्याआधीचे आणि नंतरचे आहेत. एका फोटोत त्याचे केस लांब दिसत आहेत तर दुसऱ्यात तो हेअर कट केलेला दिसत आहे. त्याचा हा लूक परफेक्ट दिसत आहे. यात तुम्ही बघू शकता की, आरव वडील अक्षय कुमारपेक्षा उंच झालाय आणि लूक्समध्ये अक्षय कुमारलाही मात देत आहे.

सुपर कॅज्युअल कपड्यांमध्ये आरवचा हा लूक फारच छान दिसत आहे. त्याच्या या फोटोंवर लोक कमेंट्सही करत आहेत. काही त्याला हॅंडसम यंग बॉय म्हणत आहे. तर सोबतच काही लोक त्याला बॉलिवूडमध्ये कधी एन्ट्री घेणार हे विचारत आहेत. आरव हा सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. त्यामुळे फॅन्स त्याच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारआरव भाटिया