Join us

'OMG 2' ला अखेर मिळालं 'ए' सर्टिफिकेट, पण अक्षयच्या भूमिकेतच केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 2:05 PM

सिनेमा वेळेतच रिलीज व्हावा म्हणून मेकर्सने नाईलाजाने सेन्सॉर बोर्डाच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अक्षय कुमारचा सिनेमा 'ओह माय गॉड 2' (OMG 2) च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपट ११ ऑगस्ट रोजीच रिलीज होईल. मात्र सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालं आहे. तसंच सिनेमात २० बदल केले जाणार आहेत. सिनेमा वेळेतच रिलीज व्हावा म्हणून मेकर्सने नाईलाजाने सेन्सॉर बोर्डाच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. आता सिनेमात नक्की कोणते बदल होणार बघुया.

सेन्सॉर बोर्डाला सर्वात मोठी अडचण हीच होती की सिनेमात अक्षय कुमारला भगवान शंकराच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे आणि फिल्मचा विषय सेक्स एज्युकेशनवर आधारित आहे. त्यामुळे सिनेमा बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे अक्षयच्या भूमिकेत मोठा बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिनेमात आता अक्षय भगवान शंकराचा दूत आणि शिवभक्त म्हणून समोर येईल ना की खुद्द महादेव. यासोबतच सिनेमात एक डायलॉग घेण्यात आला आहे, "नंदी मेरे भक्त...जो आज्ञा प्रभू".

फिल्मला अखेर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. अजित अंधारे यांनी ट्वीट करत लिहिले, 'ओह माय गॉड २ च्या रिलीज मार्ग मोकळा झाल्याचं सांगताना मला आनंद होतोय. फिल्म ११ ऑगस्टला रिलीज होत आहे. फार मोठे कट्स नाहीत फक्त काही बदल करण्यात आले आहेत जे प्रक्रियेचा भाग आहेत. थिएटर्समध्ये भेटू.'

'OMG 2' 2012 साली आलेल्या 'ओह माय गॉड'चा सिक्वल आहे. सिनेमात परेश रावल दिसणार नाहीत तर पंकड त्रिपाठी यांची मुख्य भूमिका आहे. तसंच यामी गौतमही झळकणार आहे. सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे सनी देओलचा 'गदर 2' देखील याच दिवशी रिलीज होत आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडपंकज त्रिपाठी