क्रिती सनॉनसोबत पुढच्या वर्षी सुरु करणार अक्षय कुमार 'बच्चन पांडे'चे शूटिंग

By गीतांजली | Published: November 3, 2020 04:51 PM2020-11-03T16:51:15+5:302020-11-03T16:56:11+5:30

हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला असेल.

Akshay kumar to start shooting for bachchan pandey in january next year | क्रिती सनॉनसोबत पुढच्या वर्षी सुरु करणार अक्षय कुमार 'बच्चन पांडे'चे शूटिंग

क्रिती सनॉनसोबत पुढच्या वर्षी सुरु करणार अक्षय कुमार 'बच्चन पांडे'चे शूटिंग

googlenewsNext

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आपल्या बहुप्रतिक्षित लक्ष्मी या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ट्विटरवर 'बच्चन पांडे' ट्रेंड करतो आहे. 'बच्चन पांडे' हा दुसरा तिसरा कुणी नसून अक्षय कुमारच आहे. हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.  हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला असेल.  या चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे, यासाठी ट्विटरवर चित्रपटाचे नाव ट्रेंड होत आहे.

 पुढील वर्षी मार्चपर्यंत शूटिंग सुरू होणार
 एका ट्वीटमध्ये चित्रपट समीक्षक तरण आदर्शने हा खुलासा केला आहे की, अक्षय कुमार पुढील वर्षी जानेवारीपासून जैसलमेरमध्ये आपल्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असून शूटिंग मार्चपर्यंत चालणार आहे.  फरहाद समजी दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सनॉनशिवाय आणखी एका अभिनेत्रीची चित्रपटात एंट्री झाली आहे, जिचे नाव अद्याप समोर आले नाही.  या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत.

दिवाळीनिमित्त 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमार चित्रपटाचे नाव 'लक्ष्मी बॉम्ब' असे ठेवले गेले होते, परंतु चित्रपटाच्या नावावरून झालेल्या वादानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचे नाव फक्त 'लक्ष्मी' ठेवले.  कोरोना महामारीमुळे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

Web Title: Akshay kumar to start shooting for bachchan pandey in january next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.