Join us

अक्षय कुमारनं ‘गोरखा’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं, पण घोळ झाला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:38 PM

Gorkha First Look :  होय, ‘गोरखा’च्या पोस्टरमध्ये अक्षय एक मेजर चूक करून बसला. माजी आर्मी ऑफिसर मेजर मानिक एम जोली यांनी ही चूक तात्काळ अक्षयच्या लक्षात आणून दिली. 

ठळक मुद्दे‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हटलं की, वर्षाला चार-पाच सिनेमे पक्के. आता अक्षयने एका नव्या सिनेमाची घोषणा केलीये. नाव आहे, ‘गोरखा’ (Gorkha). अक्कीने नुकतंच या चित्रपटाचा फस्ट लुक शेअर केला. पण एक घोळ झाला.  होय,‘गोरखा’च्या पोस्टरमध्ये  (Film Gorkha Poster)अक्षय एक मेजर चूक करून बसला. माजी आर्मी ऑफिसर मेजर मानिक एम जोली यांनी ही चूक तात्काळ अक्षयच्या लक्षात आणून दिली.  अक्षयने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि  माणिक एम जोली यांनी ट्विट करत पोस्टरमधील चूक निर्दशनास आणून दिली.माणिक एम जोली यांनी ‘गोरखा’च्या पोस्टरमधील चूक लक्षात आणून देणारं एक ट्विट केलं.

त्यात त्यांनी लिहिलं, ‘प्रिय अक्षय कुमार, एक माजी गोरखा अधिकारी या नात्यानं या चित्रपटाबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो. अर्थात मी तुम्हाला एक माहितीही देऊ इच्छितो.  चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. यासाठी मी तुम्हाला खुकरीचा एक फोटोही पाठवत आहे.’जोली यांच्या  ट्विटची अक्षयने लगेच दखल घेतली, हे विशेष. ‘आदरणीय, मेजर जोली जी, तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची अत्यंत काळजी घेऊ ,’ असा रिप्लाय लगेच अक्षयने दिला.

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्डोजी यांनी 1962, 1962 साली झालेल्या युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांचे अभूतपूर्व योगदान होते. या युद्धात त्यांचा एक पाय लँडमाईन ब्लास्टमध्ये गंभीररित्या जखमी झाला होता. उपचार मिळणे अशक्य होतं. म्हणून त्यांनी स्वत:च खुकरीनं आपला जखमी पाय कापून शरीरावेगळा केला होता. एक पाय गमावूनही ते इंडियन आर्मीचे पहिले डिसेबल आॅफिसर बनले आणि त्यांनी एका एका बटालियनचे नेतृत्वही केलं. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड