अक्षयकुमारने सोनम कपूरला म्हटले, ‘किती खोटं बोलतेस’, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 2:19 PM
अक्षयकुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून एकत्र येत आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ!
खिलाडी अक्षयकुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर स्टारर ‘पॅडमॅन’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. सध्या अक्षयच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. कारण अक्षय या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडी अंदाजातून तो एका गंभीर विषयावर लोकांचे प्रबोधन करताना दिसणार आहे. वास्तविक अक्षय त्याच्या रिअल लाइफमध्येही खूप खोडकर आहे. सध्या अक्षयचा त्याच्या को-स्टार्ससोबत चेष्टामस्करी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो सोनम आणि राधिकाची मस्करी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सेटवरील असून अक्षय, सोनम आणि राधिका एकमेकांसोबत विनोद करताना दिसत आहेत. एकीकडे राधिका आणि सोनम अक्षयची टर्रर्र उडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर अक्षय या दोघींचीही फिरकी घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ क्रिआज एंटरटेन्मेंटकडून अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय म्हणतो की, मी तुम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचे वाक्यपूर्ण होत नाही तोच राधिका म्हणते की, सोनम अक्षयच्या या वाक्यात काहीही तथ्य नाही. सोनम म्हणतेय, होय मलाही हे खरं वाटत आहे, कारण मी तर व्हॅनमध्ये बसलेली आहे. सोनम आणि राधिका प्रत्येकवेळी मेकअप करताना दिसत असल्याने, अक्षय त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अक्षय त्यांना म्हणतो की, ‘अब तो आजाओ’! मात्र जेव्हा त्या दोघी एकत्र येतात, तेव्हा अक्षयची फिरकी घेण्याचा प्रयत्न करतात. अशात अक्षय म्हणतो की, मला असे का वाटत आहे की, ‘रजिया फस गई गुंडो में’! अक्षय पुढे म्हणतो की, आपण तिघेही पीपीपी आहोत. सोनम-पॅरिस, मी-पंजाब आणि राधिका-पुणे. यावर सोनम म्हणते की, मी पॅरिसची नसून मुंबईची आहे. यावर अक्षय रिअॅक्ट करतो आणि म्हणतो की, ‘तू असे कशी म्हणू शकतेस? मला असे वाटत होते की, तू मला न्यूयॉर्क म्हणायला लावशील. किती खोटं बोलतेस तू!’ अक्षय, सोनम आणि राधिकाची ही चेष्टामस्करी सध्या यू-ट्यूबवर चांगलीच पसंत केली जात आहे.