बॉलिवूडमध्ये अफेअरची चर्चा होणं फार सामान्य बाब झाली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) अफेअरची सुद्धा बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. पण ही लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकली नाही.. शिल्पाने अक्षयवर दगा दिल्याचा आरोप लावला होता. शिल्पाने अक्षयवर आपला वापर करुन सोडून दिल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा केला होता.
नव्वदच्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची प्रेमकथा कुणापासून लपून राहिलेली नव्हती. प्रत्येक मासिकापासून ते चहाच्या दुकानांपर्यंत त्यांच्या प्रेमाविषयी चर्चा होती. 1994 साली 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती. 2000मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2001मध्ये अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केलं.
एकाच वेळी केलं दोघींना डेटअक्षय कुमार याआधी रवीना टंडनला डेट करत होता. रवीना आणि शिल्पा खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. 1994 साली जेव्हा शिल्पा आणि अक्षय सिनेमात एकत्र काम करते होते तेव्हा अक्षय रवीना डेट करत होता. काही वर्षांपूर्वी शिल्पा आणि रवीना दोघेही डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून आले होते. जेव्हा प्रेमात मिळाणार धोका या विषय निघाला तेव्हा या दोघी हसल्या आणि म्हणाल्या. 'हे आमच्या दोघींपेक्षा कोण चांगले ओळखू शकेल?
शिल्पा म्हणाली- अक्षयने मला धोका दिलाशिल्पाने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. शिल्पा शेट्टीने ब्रेकअपनंतर 2000 मध्ये एका टॅबलोइड वृत्तपत्राला तिने मुलाखत दिली होती. यात शिल्पाने सांगितले की अक्षय कुमारने तिची फसवणूक केली आहे. त्याने 'टू टाइमिंग' केले आहे. शिल्पाने अक्षय कुमारसोबतच्या नात्याची पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या कबुली दिली होती.
अक्षयसोबत काम न करण्याची घेतली शपथ या मुलाखतीत शिल्पा इतकी रागात होती की, स्पष्टपणे दिसत होतं की, ती आतून किती बिथरली आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टीने शपथ घेतली होती की, पुन्हा अक्षय कुमारसोबत कधीही काम करणार नाही.जेव्हा ट्विंकल खन्नाबाबत शिल्पाला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले होते की, ट्विंकल खन्नाकडून तिला काहीही तक्रार नाही. कारण दगा तिला अक्षयने दिला होता.
अक्षयने माझा वापर केलाया मुलाखतीत शिल्पा म्हणाली, 'अक्षय कुमारने माझा वापर केला. जेव्हा दुसरे कोणी सापडले तेव्हा त्यांनी मला सहजपणे सोडून दिले. तो आणि तो फक्त एकच असा व्यक्ती आहे ज्याच्यावर मी नाराज आहे कारण त्याने माझा विश्वासघात केला. मला खात्री आहे की काळा याचा हिशोब ठेवले. अक्षयने जे काही केले ते एक दिवस तो त्याच्यासोबतही घडले.