बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड' रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अक्षयने कोणतीच कसर सोडली नाहीय. मीडियाशी बोलताना अक्षय कुमारनेशाहरुख खानबाबत एक खुलासा केला आहे.
एका इंटरव्हु दरम्यान अक्षय कुमार म्हणाला की, ''माझी इच्छा होती की शाहरुख खानने या सिनेमात कोचची भूमिका साकारायला हवी होती कारण यात मी कोचच्या नाही तर मॅनेजरच्या भूमिकेत आहे.'' चक दे इंडियामध्ये शाहरुख खानने महिला हॉकी टीमच्या कोचची भूमिका साकारली होती. शाहरुखने यात कबीर खानची भूमिका साकारली होती. सिनेमात शाहरुखच्या मार्गदर्शनाखाली ही टीम वर्ल्ड कप जिंकते. आजही प्रेक्षकांना हा सिनेमा आवडतो.
अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमाबाबत बोलायचे झाले तर, १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. हीच कथा ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गोल्ड’ सिनेमामध्ये अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. रिमा कागती दिग्दर्शित गोल्डमधून मौनी रॉय सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतेय. अक्षय कुमारसोबतच यामध्ये कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. अक्षयच्या या सिनेमाची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघता येते. बेबी, हॉलिडे, रुस्तम आणि 'एअरलिफ्ट' ह्या सारख्या चित्रपटातून अक्षय कुमारने आपल्यातील देशप्रेम जागे केले आहे आणि आता या चित्रपटातून ते अधिक उंचावले जाणार आहे.