सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडमधील सुपरस्टार्सच्या फीससंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत एका चित्रपटासाठी किती फीस घेतात? हा या चर्चेचा विषय बनला आहे. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 120 कोटी रुपये घेतो, तर शाहरुखची फीस 40 कोटी रुपये आहे, अशी बातमीही नुकतीच आली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये बादशहा म्हणवल्या जाण्याऱ्या शाहरुखपेक्षाही बॉलीवूडचा खिलाडी खरोखरच 3 पट आधिक फीस घेतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही गोष्ट वेगाने पसरत असतानाच आता एका दिग्गज निर्मात्याने अथवा प्रोड्यूसरने याचे अगदी बरोबर उत्तर देत सर्वांचीच बोलती बंद केली आहे.
जॅकी भगनानीने सांगितले सत्य -जॅकी भगनानी केवळ अॅक्टरच नाहीत, तर प्रोड्यूसरदेखील आहे. खरे तर एका मुलाखतीत त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने या प्रश्नाचे उत्तर तर दिलेच, पण सर्वात पहिले, या सर्व बातम्या आणि अक्षय-शाहरुखची तुलनाच निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते हे सर्व गॉसिप आहे. याचा सत्याशी दुरान्वयेहीसंबंध नाही.
टॉप अॅक्टर्स फीस घेत नाहीत, तर...-जॅकी म्हणाला, कारण आजकाल टॉप अॅक्टर्स फीस घेत नाहीत, तर चित्रपटाच्या प्रॉफिटमध्येच आपला वाटा ठेवतात. याचाच अर्थ, चित्रपटाला जेवढा प्रॉफीट होईल, त्यातील काही वाटा अॅक्टरचाही असतो. याशिवाय, जॅकीने अक्षय कुमारच्या एवढ्या फीसवरसंदर्भातही रिअॅक्ट केले आणि त्याचा बचाव करतानाही दिसला.
अक्षय कुमार योग्य -जॅकी भगनानीने अक्षय कुमार फीसच्या बाबतीत योग्य असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्याच्यासोबत काम करणे सोपे नाही. म्हणूनच तर प्रत्येक डायरेक्टर प्रोड्यूसरला त्याच्यासोबत काम करायला आवडते आणि त्याला अनेक चित्रपटही ऑफर केले जातात.