Abhi tak India chup tha. Ab hum log bolega aur duniya sunega. #GoldTeaser Out Now.@excelmovies@FarOutAkhtar@ritesh_sid@kagtireemapic.twitter.com/sypgWtBwck— Akshay Kumar (@akshaykumar) February 5, 2018
अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाचा टीजर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 4:32 AM
अक्षय कुमार अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो वर्षाला 4 ते 5 चित्रपट करण्यावर विश्वास ठेवतो. अक्षय सोमवारी आपला आगामी ...
अक्षय कुमार अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो वर्षाला 4 ते 5 चित्रपट करण्यावर विश्वास ठेवतो. अक्षय सोमवारी आपला आगामी चित्रपट गोल्डचा टीजर रिलीज केला आहे. गोल्डचा टीजरबघून तुमच्यात देशभक्तीची भावना जागी झाल्याशिवाय राहणार नाही. यात अक्षय कुमार एका हॉकी प्लेअरची भूमिका साकारणार आहे. टीजरच्या सुरुवातीलाच अक्की नशेत दिसतो आहे. तो इंग्लंडमध्ये हॉकी खेळून-खेळून थकला आहे आणि त्याच्या मनात निराश्याची भावना उत्पन्न होते. शेवटी एक वेळ अशी येते का तो भारतीय हॉकी संघाला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतो आणि देशाला पहिले गोल्ड मेडल मिळते. या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटात ती अक्षय कुमारच्या प्रियसीच्या भूमिकेत झळकणार आहे. टीजर जर लक्षपूर्वक बघितलात तर यात मौनीची एक झलक देखली बघायला मिळते आहे. हा चित्रपट रितेश सिधलानी आणि फरहान अख्तर यांच्या बॅनर खाली तयार होतो आहे. रिमा कागती या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यात अक्षय आणि मौनीसह कुणाल कपूर, अमित साध आणि सनी कौशलची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. ALSO READ : Padman challenge:पब्लिसिटीचा अनोखा फंडा,हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन या सेलिब्रेटींनी फोटो केले शेअरलवकरच अक्षयचा पॅडमॅन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे.