अक्षय कुमारच्या 'केसरी'च्या सेटला लागल्या आगाती झाले इतक्या कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 09:36 AM2018-05-09T09:36:16+5:302018-05-09T15:06:16+5:30

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सध्या आपला आगामी चित्रपट केसरीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात अक्षयसोबत परिणिती चोप्रा ...

Akshay Kumar's 'Kesari' debacle, so many crude losses | अक्षय कुमारच्या 'केसरी'च्या सेटला लागल्या आगाती झाले इतक्या कोटींचे नुकसान

अक्षय कुमारच्या 'केसरी'च्या सेटला लागल्या आगाती झाले इतक्या कोटींचे नुकसान

googlenewsNext
लिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सध्या आपला आगामी चित्रपट केसरीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात अक्षयसोबत परिणिती चोप्रा दिसणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटातील लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातल्या 'वाई' भागात चित्रपटाची शूटिंग सुरु असताना अचानक आग लागली. त्यामध्ये ‘केसरी’चा सेट जळून खाक झाला आहे. सुदैवान यात कोणतीच जीवतहानी झाली नाही मात्र सेट जळून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसान खूप झाले आहे. टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका युद्धाचा सीन्स शूट करण्यासाठी खूप सारे फटाके आणण्यात आले होते. या सीनदरम्यान चूक झाली आणि काही क्षणांतच सेटला भीषण आग लागली. या स्फोटानंतर पूर्ण सेट नष्ट झालाय आता चित्रपटाच्या मेकर्सना मेहनत करून या सेट पुन्हा तयार करावा लागणार आहे. कारण आणखीन दहा दिवसांचे शूटिंग बाकी आहे. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, या आगीमध्ये केसरीच्या मेकर्सचे 18 कोटींचे नुकसान झाले आहे. आग लागल्या जवळपास दोन आठवड्यांनी हे आकडे कळले आहेत. मात्र वीमा कंपनीने याची नुकसान भरपाई देण्यापासून हातवर केले आहे. वीमा कंपनीच्या म्हणण्यानुसार क्रू मेंबर्सच्या चुकीमुळे ही आगा लागली. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाची को-प्रोडूसर आहे. आता जोपर्यंत सेट पुन्हा तयार नाही होत चित्रपटाची शूटिंग सुरु करणं मुश्किल आहे. 20 मे पासून केसरीची शूटिंग  लाहौल-स्पीतिमध्ये केले जाणार आहे. 12 दिवस शूट केल्यानंतर जूनमध्ये पुन्हा टीम वाईमध्ये परतून राहिलेले शूटिंग पूर्ण करणार आहे.  

ALSO READ :  अनेक वर्षानंतर अॅक्शन करताना दिसणार अक्षय कुमार, टायगर श्रॉफच्या 'बागी3'मध्ये
 
या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे.

Web Title: Akshay Kumar's 'Kesari' debacle, so many crude losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.