'लक्ष्मी बॉम्ब'मधील अक्षय कुमारचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:32 PM2019-05-18T15:32:57+5:302019-05-18T15:37:23+5:30

अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून  फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो.

Akshay kumar's look from kanchana remake laxmmi bomb out | 'लक्ष्मी बॉम्ब'मधील अक्षय कुमारचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका

'लक्ष्मी बॉम्ब'मधील अक्षय कुमारचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयने त्याच्या ट्विटरवरुन हा फोटो शेअर केला आहेअक्षयच्या सिनेमाचे पोस्टर बघून फॅन्स क्रेजी झालेत

अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून  फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयने 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात काम करत असल्याची माहिती दिली होती. या सिनेमात अक्षय एका किन्नर भूताची भूमिका साकारणार आहे.  
'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील अक्षयचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. जो बघुन त्याचे फॅन्स हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत.



अक्षयने त्याच्या ट्विटरवरुन हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय त्याच्या डोळ्याना काळज लावताना दिसतोय. अक्षयच्या सिनेमाचे पोस्टर बघून फॅन्स क्रेजी झालेत त्यांनी फोटोवर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.  तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून ‘कंचना’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता.



अक्षयसोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहेत. शबीना खान आणि तूषार कपूर ‘लक्ष्मी’ प्रोड्यूस करणार आहेत. राघव लॉरेन्स या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. राघव यांनीच ‘कंचना’चे दिग्दर्शन केले होते. 5 जूनला 2020ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अक्षय रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार आहे.
 

Web Title: Akshay kumar's look from kanchana remake laxmmi bomb out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.