आतापर्यंत तुम्ही ‘ये बाबूराव का स्टाइल है रे’;चे अनेक मीम्स पाहिले असतील. बाबुराव गणपतराव आपटे यांची व्यक्तिरेखा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. आता अक्षय कुमारच्या ‘साइड वाला स्वॅग’चे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे.
फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘साइड वाला स्वैग! सूर्यवंशी ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. यासोबत तुम्हीही या तुमच्या आवडत्या पोजमध्ये फोटो काढा आणि व्होटिंग फॉर सूर्यवंशी या हॅशटॅगसह शेअर करा. असं त्याने लिहलं होतं. हेच नाही तर मी सर्वोत्तम फोटो असलेल्या लोकांना माझ्यासोबत पोज देण्यासाठी आमंत्रित करेन. त्वरा करा, मी वाट पाहत आहे', असंही अक्षयने म्हटले आहे.
‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात राजू पैशाच्या बाबतीत नेहमीच अडचणीत सापडला. एका दृश्यात, उत्साही राजू कपडे परिधान करतो आणि त्याच्या बंगल्यासमोर उभा राहतो. कारण तो पैसे आणण्यासाठी राजपाल यादवने साकारलेल्या पप्पूची वाट पाहत आहे, आता अक्षयच्या त्या साइड स्वॅगने नेटिझन्सना अनेक मीम्स तयार करण्यास प्रेरित केले आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या १५ वर्षांनंतर, नेटिझन्स राजूच्या साइड स्वॅगवर त्यांचे प्रेम दर्शवण्यासाठी मजेदार व्हिडिओ शेअर करत आहेत. आता राजूचे चाहते हा स्वॅग इंस्टाग्रामवर ट्रेंड करत आहेत, हेच नाही कतरिना आणि इसाबेल कैफ सारख्या सेलिब्रिटींनीही त्यात भाग घेतला आहे.