Join us

अक्षय कुमारची जागेश्वर धामला भेट; ब्रदीनाथाचे दर्शन, पोलिसांसोबत मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:10 IST

जागेश्वर धाम अलौकिक आहे, म्हणूनच उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं, असे म्हणत अक्षय कुमारने हर हर महादेवचा जयघोष केला

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या धार्मिक पर्यटनावर असून नुकतेच त्याने अल्मोडास्थित प्रसिद्ध जागेश्वर धामला भेट दिली. त्यानंतर, बद्रीनाथ दर्शनासाठी अक्षय कुमार रवाना झाला होता. देवाधीदेव महादेवाचे दर्शन केल्यानंतर ब्रदी विशालच्या दारी नतमस्तक होत अक्षय विधीव्रत पूजा आणि आरतीही केली. अक्षयकुमारच्या येण्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पथक पाठवले होते. कारण, अक्षयची एक झलक पाहण्यासाठी, त्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. 

जागेश्वर धाम अलौकिक आहे, म्हणूनच उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं, असे म्हणत अक्षय कुमारने हर हर महादेवचा जयघोष केला. त्यानंतर, अक्षयकुमार बद्रीनाथ दर्शनासाठी पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता उत्तराखंडमध्ये आहे. यापूर्वी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठीही त्यांनी हजेरी लावली होती. 

शुक्रवारी अक्षयने पोलीस लाईनमध्ये व्हॉलीबॉल खेळत पोलिसांसमवेत आनंद साजरा केला. एक शाम, पुलीस के नाम या उपक्रमांतर्गत त्याने पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळला, तसेच रात्रीचे जेवणही केले. अक्षयच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी तो सध्या उत्तराखंड येथे आहे. मुसरी आणि जवळील परिसरात या चित्रपटाचं शुटींग होत आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी निमंत्रण दिल्यानंतर अक्षय कुमार पोलीस लाईनमध्ये डेहरादून येथे पोहोचला होता.  

टॅग्स :अक्षय कुमारउत्तराखंडपोलिस