बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आज म्हणजेच २८ मार्च रोजी वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याची गणना बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये केली जाते. अक्षय हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा आहे. अभिनेत्याने मुंबईतील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने ११ वी आणि १२ वी इयत्तेसाठी उटी येथील लॉरेन्स स्कूलमध्ये जाणे पसंत केले. अक्षयने 'रेस', 'दिल चाहता है', 'हंगामा', 'ताल' आणि 'हलचल', 'सेक्शन ३७५' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता नुकताच 'दृश्यम २' मध्ये दिसला होता. अक्षय खन्नाने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अनेक फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कार जिंकले आहेत.
इंडस्ट्रीत यशस्वी कारकीर्द असूनही अक्षय खन्नाने अद्याप लग्न केलेले नाही. या अभिनेत्याचे नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी त्यांचे कोणाशीही नाते फार काळ टिकू शकले नाही. बॉलिवूडच्या भाईजानप्रमाणे अक्षय अजूनही सिंगल आहे. त्याचे अजून लग्न झालेले नाही. अक्षयचे कनेक्शन बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबाशी म्हणजेच कपूर कुटुंबाशी जोडलेले दिसले. रणधीर कपूरने आपली मुलगी करिश्मा कपूरच्या नात्यासाठी अक्षय खन्नाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता, मात्र नंतर करिश्माची आई बबिता यांनी या नात्याला नकार दिला. एका मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी अक्षय म्हणाला होता की, तो लग्न मटेरियल आहे असे त्याला वाटत नाही. यासोबतच अक्षयने आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवल्याचेही सांगितले होते.