'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा झाली. १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झालेला 'छावा' सिनेमा अनेकांना आवडला. २०२५ चा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाकडे पाहिलं जातंय. 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं चांगलंच कौतुक झालं. अक्षय खन्नाने (akshaye khanna) औरंगजेब जणू मोठ्या पडद्यावर जिवंत केला. अक्षय खन्नाचे बाबा विनोद खन्ना हे राजकारणात सक्रीय होते. बाबांप्रमाणे राजकारणात एन्ट्री करणार का? असं विचारल्यावर अक्षय खन्ना काय म्हणाला?
अक्षय खन्ना राजकारणात उतरणार?
अभिनेता अक्षय खन्नाची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत वडीलांप्रमाणे अक्षय सुद्धा भविष्यात कधी राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अक्षय खन्ना म्हणाला की, "एक सामान्य नागरीक म्हणून मी रोज वर्तमानपत्र वाचतो. टीव्ही पाहतो. आजूबाजूंच्या घडामोडींचा मी आढावा घेतो. आपल्या आसपास काय सुरु आहे, याविषयी मला माहिती आहे. परंतु राजकारणात मी प्रवेश करु इच्छित नाही. मला राजकारणात यायचा अजिबात रस नाही." अशाप्रकारे अक्षयने त्याचं मत व्यक्त केलं.
अक्षय खन्नाचा औरंगजेब गाजला
'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं होतं. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसला. अक्षयने साकारलेल्या क्रूर, मग्रूर औरंगजेबाच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. अक्षय आता लवकरच आगामी साऊथ सिनेमात भूमिका करताना दिसणार आहे. सर्वांना अक्षयच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे