एकेकाळी पूजा बेदी बॉलिवूडची स्टार होती. आता तिची लेक अर्थात अलाया फर्निचरवाला (Alaya Furniturewalla ) स्टार बनलीये. आता बॉलिवूड स्टार्स म्हटल्यावर त्यांच्याबद्दलच्या चर्चाही होणार. अलायाही अधूनमधून रिलेशनशिप गॉसिप्समुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून अलाया व ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) यांच्या डेटींगच्या चर्चा आहेत. ऐश्वर्य हा बाळसाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. अनेकदा ऐश्वर्य व अलाया एकत्र दिसले. पण अलायाने ऐश्वर्याला डेट करत असल्याचे ना स्वीकारले होते, ना नाकारले होते. आता पहिल्यांदा ती यावर बोलली आहे. (Alaya Furniturewalla Aaishvary Thackeray Affair)
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती ऐश्वर्यबद्दल भरभरून बोलली. ऐश्वर्य व माझ्याबद्दल चर्चा सुरू आहेत, हे मला ठाऊक आहे. पण तो माझा फक्त एक चांगला मित्र आहे. तो खूप हुशार आणि प्रतिभावान मुलगा आहे. त्याच्या व माझ्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता चाहत्यांनाही याची सवय झालीये. माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी फार टेन्शन घेत नाही. मी फक्त माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल विचार करते. माझ्या खासगी आयुष्यात जे व्हायचे ते होईल. सध्या तरी मला माझ्या कामावर फोकस करण्याची गरज आहे, असे अलाया म्हणाली. याआधी ऐश्वर्य फॅमिली फ्रेन्ड असल्याचे अलाया म्हणाली होती.ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला होता. या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चेहरा कोणाचा तर बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिचा.होय, ऐश्वर्यचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलाया दुबईला पोहोचली होती. या पार्टीचा एक व्हिडीओ स्मिता ठाकरे यांनी शेअर केला होता. विशेष म्हणजे स्मिता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अलायाला टॅग केले होते.
त्याआधी अलायाच्या बर्थ डे पाटीर्ला ऐश्वर्यही हजर होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय या फोटोची जोरदार चर्चाची रंगली होती. अलाया आणि ऐश्वर्य यांची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अलायाच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील ऐश्वर्यने आवर्जून उपस्थिती लावली होती. अलाया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पूजाला दोन मुले आहेत अलाया आणि ओमर. पूजाने 2003 सालीपती फर्निचरवालापासून घटस्फोट घेतला होता.