Join us

अखेर या तारखेला रिलीज होणार ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:35 PM

सन १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा क्लासिक चित्रपट अनेकांना आठवत असेल. आज हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात येऊ घातलेला रिमेक

ठळक मुद्देनंदिता दास, मानव कौल,सौरभ शुक्ला हे दिग्गज कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटासाठी बजेट नव्हता. पण तो बनवण्याची जिद्द होती. याचमुळे या चित्रपटातील एकाही कलाकाराने फी घेतली नाही.

सन १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा क्लासिक चित्रपट अनेकांना आठवत असेल. नसीरूद्दीन शहा आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. केवळ इतकेच नाही तर फिल्मफेअरच्या ‘क्रिटिक्स अवार्ड’ने या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. आज हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात येऊ घातलेला रिमेक, होय, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या चित्रपटाचा याच नावाने बनलेला रिमेक अखेर येत्या १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खरे तर २०१५ पासून हा रिमेक बनून तयार होता. पण मार्केटींग आणि प्रमोशन बजट नसल्याने इतकी वर्षे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

नंदिता दास, मानव कौल,सौरभ शुक्ला हे दिग्गज कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटासाठी बजेट नव्हता. पण तो बनवण्याची जिद्द होती. याचमुळे या चित्रपटातील एकाही कलाकाराने फी घेतली नाही. एडिटर आणि म्युझिक कम्पोजर यांनीही एक पैसाही न घेता हा चित्रपट पूर्ण करण्यात आपले योगदान दिले. मानव कौल या रिमेकमध्ये नसीरूद्दीन शहा यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सौमित्र रानडे यांनी या रिमेकचे दिग्दर्शन केले आहे.हा चित्रपट अल्बर्ट पिंटो नामक पात्राची कथा आहे. देशाची राजकीय दशा आणि सामाजिक समस्या पाहून अल्बर्ट पिंटो याला कायम राग येतो. आपण या परिस्थितीत काहीच करू शकत नाही, यामुळे तो स्वत:वरही चिडतो.

टॅग्स :नंदिता दास