Join us

कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता 'मिर्झापूर'चा गुड्डू पंडीत, सांगितला पहिला पगार....

By अमित इंगोले | Published: November 20, 2020 1:50 PM

बॉलिवूड स्टार आज कितीही श्रीमंत असले तरी त्यांनाही सुरूवातीला स्ट्रगल करावा लागलाच. त्यांनीही सामान्य नोकरी करून पैसे कमावले. अभिनेता अली फजलने सांगितले की, त्याला पहिला पगार किती मिळाला होता.

प्रत्येक व्यक्तीला त्याची आयुष्यातील पहिली कमाई महत्वाची आणि नेहमी लक्षात राहणारी असते. आपलं, आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी, घर चालवण्यासाठी पैसे कमवणं सर्वांनाच करावं लागतं. बॉलिवूड स्टार आज कितीही श्रीमंत असले तरी त्यांनाही सुरूवातीला स्ट्रगल करावा लागलाच. त्यांनीही सामान्य नोकरी करून पैसे कमावले. अभिनेता अली फजलने सांगितले की, त्याला पहिला पगार किती मिळाला होता.

अली फजलने ट्विट केलं की, त्याचा पहिला पगार ८ हजार रूपये होता. हा पगार त्याला १९व्या वयात कॉल सेंटरमध्ये काम करून मिळाला होता. त्यावेळी अली कॉलेजमध्ये शिकत होता आणि कॉलेजची फी भरण्यासाठी त्याने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली होती.

सध्या ट्विटरवर एका ट्विटची चेन सुरू आहे ज्यात यूजर्स त्यांना मिळाले पहिला पगार, तेव्हाचं वय आणि काम याबाबत सांगत आहेत. अली फजलआधी दिग्दर्शक अनुभव सिन्हाने त्यांच्या पहिल्या पगाराबाबत सांगितलं होतं. अनुभव यांनी ट्विट करत सांगितले की १८व्या वर्षी त्यांनी ७व्या वर्गाच्या विद्यार्थ्याची ट्यूशन घेऊन ८० रूपये कमावले होते. त्यावेळी अनुभव इंजिनिअरींग कॉलेजमध्ये होते आणि त्यांनी हे पैसे सिगारेट घेण्यासाठी मिळवले होते.

दरम्यान, अली फजल इंग्रजी आणि हिंदीमध्ये आलेल्या श्रिया सरनच्या The Other End of the Line मध्ये पहिल्यांदा दिसला होता. दिग्दर्शक James Dodson चा हा सिनेमा २००८ साली आला होता. त्यानंतर अली फजल आमीर खानच्या 'थ्री इडियट्स'मध्ये दिसला होता. तसेच २०११ साली आलेल्या 'ऑलवेज कभी कभी' सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये त्याला 'फुकरे' सिनेमाने ओळख दिली. त्यनंतर 'मिर्झापूर' मुळे तो आता मोठा स्टार झाला आहे. 

टॅग्स :अली फजलबॉलिवूडसोशल मीडिया