Join us

लैंगिक छळाचा आरोप झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्याला वृत्तवाहिनीशी बोलताना कोसळले रडू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 4:25 PM

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गायिका मीशा शफीने अली जफरवर लैगिंक छळ केल्याचा आरोप लावला होता.

गेल्या वर्षी भारतात मीटू मोहिमेने जोर धरला होता. या मोहिम फक्त भारतातच मर्यादीत न राहता पाकिस्तानातही काही प्रकरणे समोर आली. त्यात पाकिस्तानी अभिनेता व गायक अली जफरवरदेखील आरोप करण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गायिका मीशा शफीने अली जफरवर लैगिंक छळ केल्याचा आरोप लावला होता. काही दिवसांपूर्वी अली जफरला एका वृत्त वाहिनीशी या प्रकरणावर बोलताना त्याला रडू कोसळले. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून शांत बसून हे सगळे सहन करत होतो. 

अली या व्हिडिओत आपले डोळे पुसताना दिसतो आहे. पुढे अली म्हणाला की, मीशाने सोशल मीडियावर माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप करत माझे करियर खराब केले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी शांत बसून हे सगळे सहन करतो आहे. केवळ मीच नाही तर माझी पत्नी आणि माझी मुलेदेखील या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहेत. गेली एक वर्ष मी एक चकार शब्ददेखील काढला नाही. तर त्याच्याच फायदा घेत माझ्याविरोधात सोशल मीडियावर आरोप करत राहिली.  युनायडेट नेशनपासून कोणत्याही दुसऱ्या कंपनीपर्यंत जे मला काम देतात. त्यांना टॅग करून मीशा ट्विट करून माझे करियर उद्धवस्त करते. 

मीशाने सोशल मीडियावर अलीवर आरोप केले होते. मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पहिल्यांदा बोलते आहे.  मी एकदा नाही तर अनेकदा लैंगिक शोषणाची बळी ठरले. मी तरूण होते किंवा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत नवखी होते, तेव्हा नाही तर मी एक सशक्त स्त्री म्हणून ओळखली जात असताना, परखड बोलण्यासाठी, स्वतंत्र विचारांसाठी ओळखली जात असताना, दोन मुलांची आई असताना अली जफरने माझे लैंगिक शोषण केले. अलीसोबत मी काम केले आहे. स्टेजवर तो माझा सहकलाकार होता. पण त्याच्या वागण्याने मी हादरले. मी माझ्या या पोस्टद्वारे पाकिस्तानी मुलींना हेच सांगू इच्छिते की, शांत बसू नका. स्वत:वरच्या अशा अत्याचाराविरूद्ध आवाज उठवा, असे तिने म्हटले होते़. 

मात्र न्यायालयाने याप्रकरणी अलीला निर्दोष ठरवले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये अलीने लिहिले की, मी स्वतः पुराव्यासकट मीशाला एक्सपोझ करणार आहे. त्यातच अलीच्या पत्नीनेदेखील अलीला पाठिंबा दर्शवत मीशाविरोधात ट्विट केले आहे. 

टॅग्स :पाकिस्तान