Join us

आलियाने हॉलिवूड कलाकारांना दिले तेलुगूचे धडे, 'वंडर वुमन'ने केला नमस्कार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:38 IST

'हार्ट ऑफ स्टोन'च्या निमित्ताने आलिया भट, गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्मन सिनेमाचं प्रमोशन करत आहेत.

आलिया भट (Alia Bhat) बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्येही आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे. आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत आहे. हॉलिवूडची वंडर वुमन गॅल गॅडोट (Gal Gadot)आणि जेमी डॉर्मन (Jamie Dorman) यांच्या सोबत आलिया झळकणार आहे.

'हार्ट ऑफ स्टोन'च्या निमित्ताने आलिया भट, गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्मन सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. आलियाने 'RRR' सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी ती काहीशी तेलुगू भाषा शिकली होती. हीच भाषा तिने गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्मनलाही शिकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे तोही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

'हार्ट ऑफ स्टोन' नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ११ डिसेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आलियाची सिनेमात काहीच मिनिटांची झलक दिसल्याने काही चाहते थोडे निराश झाले आहेत. मात्र तरी अभिनेत्रीच्या हॉलिवूड एंट्रीची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नुकताच आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा रिलीज झाला. सध्या सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

टॅग्स :आलिया भटहॉलिवूडबॉलिवूडसोशल व्हायरल