आलिया भटरणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली. होय, सध्या आलिया ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी ‘कलंक’ची संपूर्ण स्टारकास्ट एका शोमध्ये पोहोचली. आलिया व वरूण एकमेकांच्या शेजारी बसले असताना अचानक वरूण आलियाच्या केसांशी खेळून तिच्या खोड्या काढू लागला. आलियाने वरूणला थांबवले. पण वरूण थांबला नाही. काही वेळानंतर वरूण पुन्हा आलियाच्या खोड्या काढू लागला आणि यावेळी वरूणला थांबवताना आलियाच्या तोंडून वरूणऐवजी चक्क रणबीर निघाले. आलियाच्या तोंडून रणबीर ऐकून वरूणसह सगळेच हसू लागलेत. आदित्य राय कपूर, सोनाक्षी सिन्हा यांनाही हसू आवरणे कठीण झाले. इकडे आलियाच्या चेहरा शरमेने लाल झाला.
आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 10:31 IST
आलिया भट रणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली.
आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!
ठळक मुद्देतूर्तास रणबीर कपूर व आलिया भट दोघेही लग्न करणार, अशी चर्चा आहे. ऋषी कपूर भारतात परतल्यानंतर लगेच रणबीर व आलियाचा साखरपुडा होणार, असेही मानले जात आहे.