Join us

Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 16:25 IST

आलिया भट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकतेच तिचा हा चित्रपट सिनेमगृहात प्रदर्शित झाला आहे.   2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक 'जिगरा' आहे. यासोबतच हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे येणार,  हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याबद्दल एक अपडेट समोर आलं आहे. 

आलिया भटचा 'जिगरा' आज बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विशेषत: आलिया भटने चित्रपटातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. यासोबतच आता प्रत्येकजण सिनेमाच्या OTT रिलीजचीही वाट पाहत आहे. फिल्म बीटच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सने 'जिगरा'चे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. हा सिनेमा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 

 निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. धर्मा प्रॉडक्शन आणि इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. आलिया  आणि द आर्चीज फेम वेदांग रैना यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट सत्या (आलिया भट्ट) आणि तिचा भाऊ अंकुर (वेदांग रैना) यांच्याभोवती फिरतो. 

टॅग्स :आलिया भटसेलिब्रिटीनेटफ्लिक्स