Alia Bhatt violate the home quarantine rule: अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor), अमृता अरोरा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आणि करण जोहरची पार्टी चर्चेत आली. होय, कारण करिना व अमृता दोघीही या पार्टीला (Alia Bhatt arrived in Delhi ) हजर होत्या. करिनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच, बीएमसीने करण जोहरच्या (Karan Joahr ) पार्टीत गेस्ट म्हणून आलेल्या सर्वांना क्वारंन्टाइन होण्याचे निर्देश दिले होते. पण आलिया भटने (Alia Bhatt) या नियमाकडे दुर्लक्ष करत, चार्टड प्लेनं थेट दिल्ली गाठली. यामुळे आलियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. होय, मुंबईत परतताच आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
करण जोहरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आलियासुद्धा हजर होती. या पार्टीतील चार बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पार्टीत हजर असलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आलियाने चाचणी केली आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. याऊपरही तिला होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं. पण होम क्वारंटाइन न होता आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत दिल्लीला गेली. येथे आलियाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मोशन पोस्टर रिलीज केले.
बुधवारी आलिया व अयान दिल्लीला पोहोचले. येथे दोघांनी बंगला साहेब गुरद्वाराला भेट दिली. संध्याकाळी रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाच्या मोशन पोस्टर रिलीज केले. याचे फोटो सुद्धा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बीएमसीला याबाबत माहिती मिळताच त्यांनी दिल्ली आरोग्य विभागाला सूचना देण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही.
‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करणने त्याच्या घरी डिनर आयोजन केलं होतं. याला आलियासह करीना कपूर, अमृता अरोरा, महीप कपूर, सीमा खान यांच्यासह इतरही सेलिब्रिटी होते. या डिनर पार्टीनंतर करीना, सीमा, अमृता आणि महीप यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं. यानंतर करण जोहरसह या पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. करणची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.