Family Met Pm Narendra Modi : हिंदी सिनेसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. अभिनेता रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी आणि नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर आणि आलिया भट कपूर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. कपूर कुटुंबाने मोदींना राज कपूर चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं.
राज कपूर यांची 14 डिसेंबर रोजी 100 वी जयंती साजरी होणार आहे. 100 व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पीएमओने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये कपूर कुटुंबातील सदस्य पीएम मोदींशी संवाद साधाताना दिसत आहेत.