Join us

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत; महागड्या चप्पलांची होतेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:16 PM

अभिनेत्री आलिया भट्ट ही कायम तिचे आऊटफिट, फुटविअर आणि फॅशन सेंस यांच्याबाबतीत प्रयोग करत असते. तिला तिने केलेल्या या फॅशनमुळे चाहत्यांचे लाइक्सही मिळतात.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट ही कायम तिचे आऊटफिट, फुटविअर आणि फॅशन सेंस यांच्याबाबतीत प्रयोग करत असते. तिला तिने केलेल्या या फॅशनमुळे चाहत्यांचे लाइक्सही मिळतात. पण, आता ती एका वेगळयाच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ती म्हणजे तिच्या महागड्या चप्पलांमुळे. 

सोशल मीडियावर तिचे काही गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले असून या फोटोंमध्ये आलिया कमालीची सुंदर दिसते आहे. मात्र या फोटोंमध्ये लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे तिच्या पारदर्शक चप्पला.  या तिच्या चप्पलांकडे चाहत्यांचे लक्ष जात असल्याचे समजतेय. तिच्या या चप्पला ५४, ४५७ रूपये किंमतीच्या आहेत. या चप्पला इटालियन ब्रँडच्या असून अस्सल लेदर आणि लाइनिंगच्या आहेत. आलिया ही लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी चित्रपटात दिसणार असून रणबीर कपूरसोबतच्या तिच्या रिलेशनशिपबाबतीतही चर्चा सुरू आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही कळतेय.

टॅग्स :आलिया भट