Join us

‘आलू’चे क्यूट फोटो!  बर्थ डे गर्ल आलिया भटचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 8:00 AM

बॉलिवूडची ‘चुलबुली’ गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस. 

ठळक मुद्देआलियाला घरी प्रेमाने ‘आलू’ म्हणून बोलवतात.

बॉलिवूडची ‘चुलबुली’ गर्ल आलिया भट हिचा आज (१५ मार्च)  वाढदिवस.  15 मार्च 1993 रोजी जन्मलेल्या आलियाने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘संघर्ष’ या चित्रपटात ती बालकलाकार म्हणून झळकली आणि वयाच्या 18 व्या वर्षी लीड हिरोईन म्हणून तिचा डेब्यू झाला. आज आलिया बॉलिवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज आलियाच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सोबत तिच्या  काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत....

आलिया अर्धी काश्मिरी आणि अर्धी जर्मन आहे, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. कसे? तर  आलियाची आई सोनी राजदान या सुद्धा अर्ध्या  कश्मिरी आणि अर्र्ध्या जर्मन आहेत. सोनी राजदान यांचे वडिल जर्मन होते तर आई काश्मिरी होती.आलियाला एक सख्खी बहीण आहे. तिचे नाव शाहीन भट्ट. आलियाला दोन सात्र बहीण भाऊ-बहीणही आहेत. अभिनेत्री पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे दोघेही आलियाचे सावत्र भाऊ-बहीण आहेत.  

आलियाकडे भारताचे नागरिकत्व नाहीय. आलियाच्या आईचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. सोनी राजदान यांच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे. त्यामुळे आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आणि तेथील नागरिकत्व आहे. याच कारणामुळे सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलिया मतदान करू शकली नव्हती.

आलियाचा दिवस सुरू होतो तो सूर्यनमस्कारापासून. ती फिटनेसबाबत अतिशय  सजग आहे. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी आलियाने तब्बल १६ किलो वजन कमी केले होते. तेव्हापासून आजतागायत आलियाने आपला शेप बिघडू दिलेला नाही.

आलियाला पक्की पार्टी गर्ल आहे. तिला पार्टी करणे, मित्रांसोबत धिंगाणा घालणे प्रचंड आवडते. आलियाला लेडीज नाही तर जेंट्स परफ्युम आवडतात. अनेकदा ती जेंट्स परफ्युम लावून बाहेर पडते. विमान प्रवास करताना ती प्रचंड घाबरते. आजही विमान प्रवासात ती कमालीची नव्हर्स होते.  

आलियाचा स्वप्नातला राजकुमार कसा असेल? असा प्रश्न अनेकदा आलियाला विचारला जातो. एका मुलाखतीत तिने या प्रश्नाचे उत्तर देताना, तो पिता महेश भट्ट सारखा अजिबात नसावा, असे म्हटले होते. माझा होणारा पती माझा मित्र असावा, फन लव्हिंग असावा, असे तिने सांगितले होते.

आलिया  आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट या दोघींच्या  अतिशय जवळची आहे. आलियाला घरी प्रेमाने ‘आलू’ म्हणून बोलवतात. पडद्यावर आईसोबत काम करण्याची आलियाची इच्छा आहे.

१९९९ मध्ये अक्षय कुमार व प्रीती झिंटा यांच्या ‘संघर्ष’ या चित्रपटात आलिया बालकलाकार म्हणून झळकली होती. यानंतर २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तिने डेब्यू केला.

या चित्रपटासाठी आलियासह ५०० मुलींनी ऑडिशन दिले होते. यातून आलियाची निवड झाली होती. पण ३ महिन्यांत १६ किलो वजन कमी कर, या अटीवर करणने तिला ही भूमिका देऊ केली होती. 

आपल्या सुरूवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देईल. पण आलिया  आपल्या दुस-याच चित्रपटात डी ग्लॅम अवतारात दिसली. हा चित्रपट होता ‘हाय वे’. रणदीप हुड्डासोबतच्या या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

टॅग्स :आलिया भट