बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केले. दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी असलेल्या आलियाबाबत एक अशीही अफवा पसरली होती की ती महेश भट (Mahesh Bhat) आणि पूजा भट (Pooja Bhat) यांची मुलगी आहे. याविषयी तिने 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) मध्ये खंत व्यक्त केली होती.
अभिनेत्री पूजा भट ही महेश भट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे आणि आलियाची सावत्र बहिण आहे. आलिया भटसंदर्भात ही अफवा पसरायचं कारण म्हणजे महेश भट आणि मुलगी पूजा भट याचं ते फोटोशूट. एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये दोघंही एकमेकांना किस करतानाचा फोटो आहे. तसंच महेश भट यांनी एका मुलाखतीत सांगितलं की पूजा त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्याशी लग्न केले असते. दोघांचं हे फोटोशूट आणि ते विधान आलियाबाबतच्या अफवेचं कारण ठरलं.
'स्टुडंट ऑफ द इयर' प्रदर्शित झाल्यानंतर आलिया, वरुण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या 'कॉफी विद करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करणने आलियाला विचारले, 'तुझ्याबद्दल पसरलेली सर्वात वाईट अफवा कोणती?' तर यावर क्षणाचाही विलंब न लावता आलिया म्हणाली, 'की मी महेश भट आणि पूजा भट यांची मुलगी आहे.'आलियाच्या उत्तरावर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही शॉक झाला होता.
आलिया आता एका मुलीची आई आहे. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी आलियाने रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न केले. ६ नोव्हेंबरला तिने मुलीला जन्म दिला. 'राहा' असं त्यांच्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं. आज आलिया आई म्हणून आपला पहिलाच वाढदिवस साजरा करत आहे.