Join us

Alia Bhatt : आलियाने साईन केला एस. एस. राजमौलींचा सिनेमा, बाळाच्या जन्मानंतर सुरू होणार शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 2:07 PM

Alia Bhatt, SS Rajamouli : आलिया सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. लवकरच ती आई होणार आहे. पण तत्पूर्वी आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. होय, एस.एस. राजमौलींच्या  सिनेमात आलियाची वर्णी लागली आहे.

आलिया भटचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’  (Brahmastra) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशाच्या आनंदासोबत आलिया सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. लवकरच ती आई होणार आहे. पण तत्पूर्वी आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. होय, एस.एस. राजमौलींच्या (SS Rajamouli)  सिनेमात आलियाची वर्णी लागली आहे. राजमौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमात आलिया दिसली होती. या चित्रपटात आलियाची भूमिका फार काही मोठी नव्हती. पण या छोट्याशा भूमिकेतही तिने जीव ओतला. राजमौली तिच्या कामावर फिदा झालेत आणि आता त्यांनी तिला आपल्या नव्या चित्रपटासाठी साईन केल्यांचं कळतंय.

 एस.एस.राजामौलींच्या आगामी चित्रपटामध्ये आलिया साऊथ सुपरस्टार महेश बाबूसह (Mahesh Babu) दिसणार आहे. समीक्षक उमेर संधू यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.‘एस.एस.राजामौलींच्या आगामी एसएसएमबी29  या चित्रपटामध्ये आलिया भटमहेश बाबू एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आलियाच्या बाळाच्या जन्मानंतर सुरु होईल,’असं त्यांनी या  ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

आलिया यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस बाळाला जन्म देऊन शकते. यानंतर काही काळ विश्रांती केल्यानंतर ती राजमौलींच्या चित्रपटात बिझी होणार आहे. साहजिकच चाहते या बातमीनं खुश्श आहेत. पहिल्यांदा महेश बाबू व आलियाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार, हे ऐकूनही चाहते केझी झाले आहेत. अर्थात आलिया वा राजमौलींनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

आलियाने काही महिन्यांआधीच हॉलिवूड चित्रपटाचं शूटींग पूर्ण केलं. हार्ट ऑफ स्टोन नावाचा हॉलिवूड सिनेमा हातावेगळा केल्यानंतर ती लगेच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये बिझी झाली होती. आलियासाठी 2022 वर्ष तिच्यासाठी प्रचंड लकी ठरलं आहे. या वर्षात तिचे गंगुबाई काठियावाडी, आरआरआर, डार्लिंग्ज आणि ब्रह्मास्त्र  असे सिनेमे प्रदर्शित झालेत. या सर्व सिनेमांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  सध्या आलिया टॉपची हिरोईन आहे. वर्षभरात 100 कोटींची कमाई करणाऱ्या तीन चित्रपटांमध्ये काम करणारी ती पहिली अभिनेत्री आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिने रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधली. यानंतर लग्नाला उणेपुरे दोन महिने होत नाही तोच तिने प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

टॅग्स :आलिया भटएस.एस. राजमौलीबॉलिवूडमहेश बाबू