आलिया भटने (Alia Bhatt) फार कमी वयात मोठं यश मिळवलं. आपल्या मतांवर ठाम असलेली, परखडपणे बोलणारी अशीही आलियाची ओळख आहे. अनेकदा ती वादात अडकली, ट्रोलिंगची शिकार झाली, पण आलियाने कधीच कुणाची पर्वा केली नाही. तूर्तास काय तर आलियाच्या अशाच परखड मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.एका रेडिट युजरने तिला हा जुना व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. या व्हिडीओत आलिया तिचे वडील महेश भट (Mahesh Bhatt) यांच्या विवाहबाह्य संबंधांवर बोलली.
आलियाचे वडील महेश भट्ट यांनी दोन लग्नं केलीत. किरण यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न झालं. किरण यांच्यापासून त्यांना राहुल व पूजा अशी दोन अपत्ये आहेत. दोन मुलांचा बाप असलेले महेश भट एका वळणावर सोनी राजदान यांना भेटले आणि त्यांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न केलं होतं. सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना आलिया व शाहीन अशा दोन मुली झाल्या.
आलिया म्हणते....‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाला विवाहबाह्य संबंध व व्यभिचार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. मी व्यभिचाराचं समर्थन करत नाही. पण कोणत्या ना कोणत्या कारणानं असं होतं. माझे वडील माझ्या आईला भेटले, त्यांचं अफेअर होतं. अशा घटनांकडे पाहण्याचा माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे. कधीकधी अशा घटना घडतात. मी याचं समर्थन करत नाही, पण माणसांना ओळखते. माणसं कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वागतात याचा विचार करण्याची गरज आहे. आपण बऱ्याचदा वेगळ्याच गोष्टींमुळे लोकांना पारखत असतो आणि त्यावरुन त्यांच्याविषयीचे मतं ठरवतो. व्यक्ती त्या त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेतो, हे जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. विश्वासघात करणं किंवा कुणाला धोका देणं ही काही नवीन गोष्ट नाही. ती यापूर्वी देखील झाली आहे. फक्त याकडे आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.., असं आलिया मुलाखतीत म्हणतेय.
विशेष म्हणजे, या जुन्या व्हिडीओवरून आलिया पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ही व्यभिचार, विश्वासघात सामान्य म्हणतेय, रणबीरने असं काही केलं की समजेल, अशी कमेंट एका ट्रोलरने केली आहे. बापाची बाजू घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नाही, असं एकाने म्हटल्ं आहे.