Join us  

"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:11 PM

संजय लीला भन्साळींचा खुलासा

आलिया भट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात तिने केलेली भूमिका विशेष गाजली. आलियाचं भन्साळींसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण या सिनेमाच्या आधी आलियाला भन्साळींनी 'इंशाल्लाह' सिनेमाचीही ऑफर दिली होती. यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत असणार होता. मात्र नंतर काही कारणाने हा सिनेमा डबाबंद झाला. याचा आलियाला प्रचंड धक्का बसला होता असा खुलासा भन्साळींनी नुकताच केला आहे.

संजय लीला भन्साळींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "इंशाल्लाह सिनेमा जेव्हा बंद पडला तेव्हा आलियाला सदमा लागला होता. तिचं ब्रेकडाऊन झालं होतं. ती खूप रडली, ओरडली, स्वत:ला खोलीत बंदही करुन घेतलं. मात्र याच्या एक आठवड्यानंतरच मी तिला गंगूबाई सिनेमात लीड रोल ऑफर केला. तेव्हा आलिया गोंधळून गेली की ती हे करु शकेल की नाही? मी तिला समजावलं आणि नंतर तिने गंगूबाईची भूमिका उत्तम साकारली."

आलिया लवकरच संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' मध्येही दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूरही आहे. तसंच विकी कौशलही यामध्ये झळकणार आहे. या तिघांना एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. २०२६ साली सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूड