Join us

Alia Bhatt Daughter Name: आलिया-रणबीरनं लेकीचं नाव केलं फायनल, या व्यक्तीशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:38 IST

Alia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Name:आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या बाळाच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

६ नोव्हेंबर रोजी आलिया भट(Alia Bhatt)ला कन्या रत्न प्राप्त झाला आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. पण त्यांची प्रायव्हसी लक्षात घेऊन आलिया आणि रणबीरने बाळाला भेटणाऱ्या आणि फोटो काढणाऱ्यांसाठी काही नियम केले आहेत. अशा परिस्थितीत आता बातमी समोर येत आहे की, आलिया-रणबीरने बाळाचे नाव फायनल केले आहे. मुलीच्या नावाचा कपूर कुटुंबाशी खास संबंध असणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, लवकरच आलिया भट-रणबीर कपूरच्या बाळाचे नाव फायनल झाले आहे आणि ते लवकरच त्याची घोषणा करू शकतात. रिपोर्टनुसार, बाळाच्या नावाचा संबंध रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या नावाशी आहे.

रिपोर्टनुसार, आलिया भट आणि रणबीर कपूरचा हा विचार समल्यानंतर नीतू कपूर भावूक झाल्या होत्या. बाळाच्या आगमनाने नीतू कपूर खूप खूश आहेत, आता त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. जेव्हा पापाराझींनी नीतू कपूरला बाळाबद्दल विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या की, 'आतापर्यंतचा सर्वात गोंडस बाळ आहे'. बाळाचं नाव ऋषी कपूर यांच्या नावाशी संबंधित असल्यामुळे नक्की काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर