Join us  

Alia Bhatt : आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या लेकीला घेऊन घरी निघाली; पाहा पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 10:52 AM

Alia Bhatt Discharged From Hospital : आज सकाळी आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रूग्णालयातून बाहेर पडत असतानाचे त्यांचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत...

नुकतीच आई बनलेल्या आलिया भटला  (Alia Bhatt) रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व आलिया भट दोघेही मॉम डॅड आपल्या प्रिन्सेसला घेऊन घरी निघालेत. आज सकाळी आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रूग्णालयातून बाहेर पडत असतानाचे त्यांचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

रणबीर व आलिया आपल्या लेकीला घेऊन रूग्णालयाबाहेर पडले. ब्लॅक कलरच्या रेंज रोव्हरमधून तिघेही घराकडे निघाले. कपूर घराण्याच्या राजकुमारीची पहिली झलक पाहण्यासाठी सगळेच आतूर आहेत. पापाराझींनी आज सकाळपासूनच रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. आलिया व रणबीरची गाडी बाहेर पडताच पापाराझींनी एकच गर्दी केली.

रणबीरने आपल्या लेकीला छातीशी कवटाळलं होतं. त्यामुळे चिमुकलीची झलक पाहायला मिळाली नाही. पण प्रसूतीनंतर आलियाची झलक मात्र पाहायला मिळाली. नो मेकअप लुकमधील आलियाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. मागच्या सीटवर आलिया तिच्या मुलीला घेऊन बसलेली होती. यावेळी रणबीर व अलिया दोघंही मुलीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची काळजी घेताना दिसले.

आलियाने गेल्या 6 नोव्हेंबरला एक गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आजी बनल्याचा आनंद नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. बाप झाल्याने रणबीरही खुश्श आहे. लेकीला पहिल्यांना कुशीत घेतल्यावर रणबीर भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

मुलीच्या जन्मानंतर आलियाने एक पोस्ट शेअर केली होती. ‘आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ही मुलगी कसली जादुई आहे.... आज आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम...’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

आलियाने सी-सेक्शनद्वारे मुलीला जन्म दिल्याचं कळतेय. आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुºया दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूड