Join us

बोटॉक्स सर्जरी केल्याच्या चर्चांवरुन आलिया भट भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:51 IST

आलियाने बोटॉक्स सर्जरी केल्याची चर्चा झाली. या चर्चांवर तिने लांबलचक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

आलिया भट (Alia Bhatt) करिअरमध्ये तिच्या सर्वोच्च शिखरावर आहे. पदार्पणापासूनच तिने अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. आलियाचं सौंदर्यही अगदी नॅचरल आहे. तिची सुंदर गोऱ्यापान स्कीनचंही खूप कौतुक होतं. मात्र नुकतीच तिच्याबद्दल एक अफवा पसरली. आलियाने बोटॉक्स सर्जरी केल्याची चर्चा झाली. या चर्चांवर आलियाने लांबलचक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

आलिया भटने सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर केली. ती लिहिते, "कॉस्मेटिक करेक्शन किंवा सर्जरी ही प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. यावरुन जजमेंट करणं योग्य नाही. तुमचं शरीर, तुमची इच्छा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. काही लोक व्ह्यूजसाठी वाटेल ते कमेंट करतात. मी बोटॉक्स सर्जरी केली आणि ती फेल झाली असं लोक माझ्याबद्दल बोलत आहेत. माझी स्माईल वाकडी आहे, तुम्ही लोक असं म्हणत आहात जसं काय मला लकवा लागला आहे. अशा प्रकारच्या गोष्टी करणं चुकीचं आहे."

ती पुढे लिहिते, "याप्रकारे महिलांवर कमेंट्स पास केल्या जातात. नेहमी त्यांना एकाच तराजूत तोललं जातं. त्यांचा चेहरा, शरीर, वैयक्तिक आयुष्य, अगदी आमच्या बॉडीवरुनही ट्रोल केलं जातं. सर्वात दु:खी गोष्ट म्हणजे या कमेंट्स महिलांकडून पण येतात. जगा आणि जगू द्या आणि प्रत्येकाला स्वत:ची चॉईस करण्याचा पूर्ण अधिकार आहे."

आलिया भटचा 'जिगरा' सिनेमात नुकताच रिलीज झाला. यातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. आता ती संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूड