Join us

रणबीरला मिळाली ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’! आलिया भट्टने दिली अप्रत्यक्ष कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 12:32 PM

रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता..., हे शब्द तुम्हाला आठवत असतीलचं. हे शब्द आहेत,शब्द रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे.

रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता..., हे शब्द तुम्हाला आठवत असतीलचं. हे शब्द आहेत,शब्द रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे. नीतू सिंग अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरबदद्ल भरभरून बोलल्या होत्या. रणबीर मुलगा म्हणून कसा आहे, तो किती हळवा आहे, त्याचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे, हे सगळे त्यांनी आईच्या नजरेतून सांगितले होते.रणबीरच्या आयुष्यात कशी मुलगी असलेली तुम्हाला आवडेल, असे विचारले असता, त्याला साधी सरळ मुलगी हवी, अशा त्या म्हणाल्या होत्या़ रणबीर कमालीचा लाजाळू आहे. तो स्वत:हून कुण्याच मुलीला अ‍ॅप्रोच झाल्याचे मी पाहिले नाही. रणबीरचा साधेपणा समजून घेणारी मुलगी त्याला मिळावी, असे मला वाटते. ‘रणबीर दालचावल टाईप सिंपल लडका है. कोई हाई मेंटेनेंस टाईप लडका नहीं. इसलिए वह कोई हाई प्रोफाईल व हाई लाईफस्टाईलवाली पत्नी संभाल नहीं पाएगा,’ असे त्या म्हणाल्या होत्या. नीतूंची ही इच्छा अर्थातचं पूर्ण झाली आहे. होय, रणबीरला साजेशी ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’ त्याला मिळाली आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुम्हाला कळले असेलच. होय, आलिया भट्ट हिच्याचबद्दल. आलिया अगदी रणबीरला हवी तशी ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’ आहे आणि हे आम्ही नाही तर खुद्द आलियानेचं म्हटले आहे.

होय, इन्स्टाग्रामवरील ‘आक्स मी एनिथिंग’वर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुद्द आलियानेचं हे स्पष्ट केले. तुझे आवडते जेवण कोणते, असा प्रश्न या चाहत्याने आलियाला केला. यावर ‘I’m a ghar ka khana kinda girl. Dal Chawal types,’ असे आलियाने लिहिले. तिच्या या उत्तरातून तिने नीतू कपूर यांची काळजी तर दूर केलीच. शिवाय रणबीरसोबतचे स्वत:च्या नात्याचीही अप्रत्यक्ष कबुली दिली़.

तुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या रणबीर व आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जोरात आहे. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय. आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरनितू सिंग